Last Updated: Friday, October 12, 2012, 07:41
www.24taas.com, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन तेंडुलकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिय अमितजी, तुम्हांला ७० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, देव तुम्हांला आनंदी ठेवो आणि चांगले आरोग्य देवो, असे म्हटले होते.
तेंडुलकर याच्या या फेसबुकवरील पोस्टमध्ये स्वतःचा आणि बच्चन यांचा फोटो आहे. या फोटोला ३१९३४ जणांनी लाइक केले आहे. तर यावर तीन तासांत १८६६ प्रतिक्रिया आल्या आहेत.
First Published: Thursday, October 11, 2012, 22:27