पंजाब ठरले 'किंग', शेवटच्या बॉलवर 'वीन' - Marathi News 24taas.com

पंजाब ठरले 'किंग', शेवटच्या बॉलवर 'वीन'

www.24taas.com, मोहाली
 
डेक्कन चार्जस आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये झालेल्या मॅचमध्ये पंजाबने बाजी मारली. डेव्‍हीड हसीने आपल्या टीमचा विजय साकारला. तर गुरकीरत सिंग खरा किंग हिरो ठरला. हसीने ३५ बॉलमध्‍ये ६५ रन करुन विजय साकारला.
 
या विजयामुळे पंजाबला प्‍लेऑफ फेरीत पोहोचण्‍याच्या आशा बळावल्या आहेत. अखेरच्‍या तीन ओव्हरमध्‍ये गुरकीरत सिंगने हसीला चांगली साथ दिली. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी १६ रनची गरज असताना गुरकीरतने १ सिक्स आणि १ फोर मारुन सामना फिरविला. तर शेवटच्या बॉलवर फोर मारून विजय अक्षरश खेचून आणला. त्‍याने १२ बॉलमध्ये २९ रन केले.
 
खराब सुरुवातीनंतर डेव्‍हीड हसी आणि अझर मेहमूदने आक्रमक पवित्रा घेत चार्जर्सला विजयाच्‍या दिशेने नेले.  मेहमूद ३१ रन काढून आऊट झाला. हसीसोबत त्‍याने ४४ रनची पार्टनरशीप केली. डेव्‍हीड हसीने झंझावाती अर्धशतक ठोकून पंजाबच्‍या विजयाच्‍या आशा पल्‍लवित ठेवल्‍या. त्‍याने २७ बॉलमध्‍ये ४ सिक्स आणि ४ फोरची आतषबाजी करीत अर्धशतक पूर्ण केले. परंतु, दुसऱ्या बाजुने त्‍याला अपेक्षित साथ मिळाली नाही. सिद्धार्थ चिटणीसही ११ रन काढून परतला. त्‍यानंतर पियुष चावलाही आऊट झाला.
 
 
 
 
 
 

First Published: Monday, May 14, 2012, 10:48


comments powered by Disqus