Last Updated: Wednesday, May 16, 2012, 15:58
www.24taas.com, चंदीगड अमेरिकेतून कँसरवर उपचार घेऊन परतलेला भारताचा युवराज सिंगला पंजाब सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
२०११ वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या युवीला त्याचा या कामगिरीसाठी हा एक कोटीचा पुरस्कार जाहिर करण्यात आलाय.. या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या हस्ते युवीचा हा सत्कार करण्यात येणार आहे.
कॅन्सरवरील उपचारामुळे करण्यात आलेल्या केमोथेरपीमुळे अशक्त बनलेला युवराज आणखी काही महिने खेळू शकणार नाही. मात्र आपण पुन्हा पूर्वीसारखं खेळू शकू असं युवराजनं म्हंटलय. सलग ४ आयपीएल खेळणा-या युवीनं या सिझनमध्ये आपल्याला खेळता आलं नसल्याची खंत यापूर्वीच ट्विटवरवरून व्यक्त केली होती.
First Published: Wednesday, May 16, 2012, 15:58