Last Updated: Friday, May 18, 2012, 23:50
www.24taas.com, हैद्राबाद 
डेक्कन चार्जसने राजस्थान रॉयल्सला दे धक्का दिला... आणि स्पर्धेतून धक्का देत बाहेर काढलं आहे. राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफ फेरीत जाण्याची आशा संपली आहे. डेक्कन चार्जर्सने ५ विकेटसने विजय मिळवून राजस्थानच्या आशेवर पाणी फेरले.
राजस्थानच्या फलंदाजांनी निराशा केल्यानंतर गोलंदाजही अपयशी ठरले. अखेरच्या काही षटकांमध्ये ३ विकेट्स घेऊन राजस्थानच्या गोलंदाजांनी डेक्कनला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, सलामीवीरांनी चोख कामगिरी बजाविल्यामुळे डेक्कनच्या मधल्या फळीला अडचण आली नाही.
डेक्कन चार्जर्सचे सलामीवीर शिखर धवन आणि अक्षत रेड्डी यांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये ६० धावांची सलामी देऊन विजयाकडे वाटचाल सुरु करुन दिली. दोघांनी ६३ धावांची सलामी दिली. धवन २६ धावा काढून बाद झाला. त्यानंतर रेड्डीने आक्रमक फलंदाजी सुरुच ठेवली. त्याने ४२ धावा काढल्या. पुण्याविरुद्ध हिरो ठरलेला अजित चंदिला आज अपयशी ठरला. त्याला एकच विकेट मिळाली.
First Published: Friday, May 18, 2012, 23:50