सुटला...पॉमर्सबॅचला जामीन, पासपोर्ट जप्त - Marathi News 24taas.com

सुटला...पॉमर्सबॅचला जामीन, पासपोर्ट जप्त

www.24taas.com, नवी दिल्ली
 
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू असणाऱ्या ल्युक पॉमर्सबॅचला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं जामीन मंजुर केला आहे. केवळ ३० हजाराच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे.
 
ल्युकला आपला पासपोर्टही जमा करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे त्याला कोर्टाच्या परावानगीशिवाय भारत सोडता येणार नाही. जेव्हा-जेव्हा कोर्ट बोलवेल त्या-त्यावेळी त्याला कोर्टात हजर रहाव लागणार आहे. कोर्टानं सुनावणीदरम्यान हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. आणि त्यानंतरच हा निर्णय दिला. तत्पूर्वी, अमेरिकन महिला जोहल आणि तिच्या मित्राला ल्युकने एका पार्टीत मारहाण केली होती.
 
त्यानंतर त्याला पोलिसांनी अटकही केली होती. ल्य़ुक आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो आहे. या प्रकरणानंतर विजय माल्ल्यांनी त्याची टीममधून हकालपट्टीही केली होती. दरम्यान, ल्युकला जामीन मिळाला असला तरी, त्याच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप कायम राहणार आहेत.
 
 
 

First Published: Saturday, May 19, 2012, 18:02


comments powered by Disqus