दिल्ली विजय पथावर, पंजाब परतीच्या मार्गावर - Marathi News 24taas.com

दिल्ली विजय पथावर, पंजाब परतीच्या मार्गावर

www.24taas.com, धर्मशाला
 
दिल्लीने आपला दबदबा कायम राखला आहे. आपला शेवटच्या लीग मॅचमध्ये दिल्लीने पंजाबवर दणदणीत विजय मिळविला आहे. आयपीएलमध्ये पहिल्या स्थानी आपली झेप कायम ठेवली.
 
ओपनर डेविड वॉर्नरच्या तडाखेबाज ७९ रन व मॉर्ने मॉर्केल व उमेश यादव यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जीवावर पंजाबचा सहज पराभव केला. याचबरोबर प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या पंजाबच्या आशा मावळल्या. त्याचे १६ सामन्यात आठ विजयासह १६ गुण झाले.
 
पंजाबला आजचा सामना जिंकणे गरजेचे असताना त्यांच्या फलंदाजांनी कच खाल्याने पंजाबने दिल्ली डेयरडेविल्सपुढे १४२ धावांचे माफख आव्हान दिले होते. त्याचा पाठलाग करताना दिल्लीने आक्रमक सुरुवात केली होती. अखेर दिल्लीने हे आव्हान १८.२ षटकात ४ गड्याच्या मोबदल्यात पार केले. वेणूगोपाल राव २१ धावावर नाबाद राहिला. पंजाबकडून हॅरीस आणि अझर मेहमूद यांनी प्रत्येकी दोन-दोन गडी बाद केली.
 
 
 
 
 
 
 

First Published: Saturday, May 19, 2012, 21:24


comments powered by Disqus