केकेआर विजयी, पुण्याची टीम उणीच - Marathi News 24taas.com

केकेआर विजयी, पुण्याची टीम उणीच

www.24taas.com, पुणे
 
पुण्याने शेवटच्या मॅचमध्येही आपण काहीच करू शकत नाही... हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने पुण्यातील गव्हुंजे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पुणे वॉरियर्सचा ३४ धावांनी पराभव करीत या स्पर्धेत दुसरे स्थान पटकावले.
 
कोलकात्याने प्रथम फलंदाजी करीत पुण्याला १३७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र त्याचा पाठलाग करताना पुण्याने निर्धारित २० षटकात ८ बाद १०२ एवढीच मजल मारली. कोलकात्याकडून अष्टपैलू कामगिरी करणा-या शाकीब अल-हसनला सामनावीर पुररस्कार देण्यात आला.
 
त्याने कोलकाताकडून सर्वाधिक ४२ काढल्या व त्यानंतर दोन महत्त्वाचे फलंदाज तंबूत धाडले. माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पुण्याची सुरुवात खराबच झाली. सलामीवीर रॉबिन उथप्पा केवळ ८ धावा काढून एक सोपा झेल देऊन बाद झाला.
 
 
 
 
 

First Published: Sunday, May 20, 2012, 09:49


comments powered by Disqus