Last Updated: Wednesday, May 23, 2012, 21:18
www.24taas.com, पुणे वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा रक्षकांशी झालेल्या बाचाबाचीचे प्रकरण अजून कुठे थंड झाले नसताना कोलकता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवुड किंग शाहरुख खान पुन्हा एकदा नव्या प्रकरणात फसताना दिसत आहे. पुण्यात कोलकता नाईट रायडर्स आणि दिल्ली डेअर डेव्हिलच्या सामन्याच्यावेळी शाहरुखने कमेंट करणाऱ्या प्रेक्षकाला बूट दाखविल्याचे एका चॅनलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यात शाहरुखच्या कोलकता नाईट रायडर्सने दिल्लीचा १८ धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी पहिल्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश मिळविला. यावेळी शाहरुखने मैदानावर उतरून जबरदस्त जल्लोष केला. आपल्या खेळाडूंना मिठ्या मारल्यात आणि तो बेफान होऊन वावरत होता.
या दरम्यान शाहरुख काही प्रेक्षकांजवळही गेला. त्यावेळी प्रेक्षकांमधून काही जणांनी त्याच्यावर कमेंट केली. त्यानंतर शाहरुख नाराज झाला आणि त्याने आपल्या बुटाकडे इशारा केल्याचे चॅनलच्या वृत्तात म्हटले आहे.
First Published: Wednesday, May 23, 2012, 21:18