चेन्नई जिंकली, मुंबईला घरी पाठवलं - Marathi News 24taas.com

चेन्नई जिंकली, मुंबईला घरी पाठवलं

 www.24taas.com, बंगळुरु
 
कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची आक्रमक फलंदाजी व त्याच्या कल्पक नेतृत्वामुळे चेन्नई सुपरकिंग्जने मुंबई इंडियन्सचा ३८ धावांनी पराभव करीत क्‍वॉलिफायर- २ मध्‍ये सहज प्रवेश केला.
 
चेन्नईने दिलेल्या १८८ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित २० षटकात ९ बाद १४९ धावा करु शकला. कर्णधार धोनीने केवळ २० चेंडूत काढलेल्या आक्रमक (नाबाद ५१) अर्धशतकामुळे आणि त्यांचा आकर्षक फलंदाजीनंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केल्याने मुंबईला कोणतेही संधी मिळाली नाही.
 
चेन्नईकडून मॉर्केल व ब्रॉव्होने दोन- दोन गडी बाद केले. तर, जकाती, हैलफैनिस, आर. अश्विन व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला. धोनीला सामनावीर घोषित करण्यात आले. चेन्नईचा सामना आता क्‍वॉलिफायर १ मधील पराभूत टीम दिल्‍ली डेअरडेव्हिल्‍सशी होणार आहे. आता चेन्नई व दिल्ली यांच्यातील क्‍वॉलिफायर 2 चा विजयी संघ अंतिम सामन्‍यात कोलकाता नाईट रायडर्सशी चेन्‍नईमध्‍ये भिडेल.
 
 
 
 

First Published: Thursday, May 24, 2012, 00:08


comments powered by Disqus