Last Updated: Thursday, May 24, 2012, 11:26
www.24taas.com, मुंबई टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हरभजन सिंग लवकरच मॉडेल अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.सप्टेंबरमध्ये आपण विवाहबद्ध होणार असल्याचे स्वत: भज्जीनेच सांगितलं आहे.
गीता बासरा आणि भज्जी यांच्यात अनेक वर्षांपासून मैत्री आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या प्रेमसंबंधांबद्दल बातम्या प्रसिद्ध होत होत्या. मात्र, दोघांनी या बद्दल जाहीर वक्तव्य करणं टाळलं होतं. मात्र, आता दोघांच्याही घरच्यांचा लग्नाला पाठिंबा मिळाल्यामुळे भज्जी आणि गीता लग्न करणार आहेत.गीता बसराच्या इंग्लंडमधील यॉर्कशायर येथील घरात लग्नाला प्रारंभ होणार असून हरभजन सिंगच्या पंजाबमधील जालंधर येथील घरी हा विवाह संपन्न होणार आहे.
गीता बासरा ही अनिवासी भारतीय अभिनेत्री असून तिने ‘दिल दिया है’ आणि ‘ट्रेन’ या दोन चित्रपटांत काम केलं आहे. या दोन्हीही चित्रपटात इमरान हाश्मी तिचा सहकलाकार होता.
First Published: Thursday, May 24, 2012, 11:26