Last Updated: Friday, May 25, 2012, 23:59
www.24taas.com, चेन्नई आजच्या सेमीफायनलमध्ये ८६ रन्सनं दिल्ली डेयरडेव्हिल्सचा पराभव करत चेन्नई सुपरकिंग्जनं आयपीएल सीझन ५ च्या फायनलमध्ये धडक मारलीय. आयपीएल – ४ आपल्या घशात टाकणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. सलग तिसऱ्यांदा चेन्नईनं फायनलमध्ये धडक मारलीय.
दिल्ली डेयरडेव्हिल्सचा कॅप्टन वीरेंद्र सेहवागनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे पहिल्यांदा मिळालेल्या संधीचं सोनं करत चेन्नईनं दिल्लीपुढं २२३ रन्सचं तगडं आव्हान ठेवलं. २० ओव्हर्समध्ये ५ आऊट २२२ रन्स चेन्नईनं केल्या. यामध्ये मुरली विजय ११३, रैना २७, हसी २०, धोनी २३ आणि ब्राव्होनं नॉट आऊट ३३ धावा करत दिल्लीच्या बॉलर्सला अक्षरश: तोंडावर पाडलं. मुरली विजयला मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला.
२३३ रन्सचा पाठलाग करताना दिल्लीला धाप लागली. पण मॅचवर फारसा प्रभाव ते टाकू शकले नाहीत आणि तब्बल ८६ रन्सनं दिल्लीला पराभवाला सामोरं जावं लागलं. १६.४ ओव्हर्समध्ये ऑल आऊट १३६ रन्सपर्यंतच दिल्लीची मजल गेली. महेला जयवर्धने यानं सर्वाधिक म्हणजे ५५ रन्स दिले. तर रॉस टेलरनं २४, आंद्रे रसेलनं १७, वेणूगोपाळनं १० रन्स दिले. बाकीचे सगळे प्लेअर्स मात्र सपशेल फ्लॉप ठरले.
First Published: Friday, May 25, 2012, 23:59