सचिन घेणार ४ जूनला शपथ - Marathi News 24taas.com

सचिन घेणार ४ जूनला शपथ

www.24taas.com, नवी दिल्ली
 
क्रिकेटचा देव म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खासदारकीची शपथ ४ जूनला घेणार आहे. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमामुळे सचिनला खासदारकीची शपथ घेता आली नाही.
 
सचिन ४ जून रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणार आहे . हा शपथविधी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या दालनात होणार आहे , अशी माहिती संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव शुक्ला यांनी बुधवारी दिली .
 
सचिनसोबतच राज्यसभेवर निवडण्यात आलेल्या अभिनेत्री रेखा आणि उद्योजिका अनू आगा यांनी १६ मे रोजी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सचिन  कधी शपथ घेतो याकडे लक्ष लागले होते.

First Published: Thursday, May 31, 2012, 10:16


comments powered by Disqus