Last Updated: Monday, December 5, 2011, 05:45
झी २४ तास, मुंबई सचिन तेंडुलकर नावाचा कोहिनूर घडवला तो कोच रमाकांत आचरेकर यांनी. सचिनला बालपणी क्रिकेटचे धडे देणारे आचरेकर शनिवारी ७९ वर्षांचे झाले. आचेरकर सरांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत शनिवारी त्यांच्या शिष्यांकडून एका खास कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत. यावेळी सचिनने खास उपस्थिती लावून आचरेकर सरांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यांच्यासह यावेळी भारतीय क्रिकेटमधील अनेक दिग्गज प्लेअर्स यावेळी उपस्थित होते.
First Published: Monday, December 5, 2011, 05:45