वेस्ट इंडिजला दुसरा झटका, हयात बाद - Marathi News 24taas.com

वेस्ट इंडिजला दुसरा झटका, हयात बाद

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. १५.३ षटकांपर्यंत वेस्ट इंडिजने २ गडीच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या आहेत.
 
वेस्ट इंडिजला भारताने दोन धक्के दिले. विनय कुमारने सिमन्सला तर मिथुनने हयातला तंबूत धाडले. सिमन्स एका धावेवर तर हयात २० धावा करून बाद झाला.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना खिशात घालून ही मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. गोलंदाज वरुण अॅरानऐवजी अभिमन्यू मिथुनला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. तर विंडीजच्या संघात मात्र काहीही बदल केलेला नाही.

First Published: Monday, December 5, 2011, 10:26


comments powered by Disqus