Last Updated: Monday, December 5, 2011, 17:55
झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद वेस्ट इंडिजने भारतासमोर २६१ धावांचे आव्हान समोर ठेवलं आहे. वेस्ट इंडिजने ५० षटकात पाच बाद २६० रन्स केल्या. वेस्ट इंडिजच्या सैमीने १७ चेंडूत ४१ धावांचा पाऊस पाडला तर रसेलने १८ चेंडूत ४० धावा फटकावल्या. रसेलने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. वेस्ट इंडिजच्या फलंदांजांनी शेवटच्या दोन षटकात ४३ धावा कुटल्या. तर शेवटच्या सात षटकात ९३ धावांची लयलूट केली. विनय कुमारे दोन बळी घेतले तर यादव आणि मिथून यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. १५.३ षटकांपर्यंत वेस्ट इंडिजने २ गडीच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या आहेत. वेस्ट इंडिजला भारताने दोन धक्के दिले. विनय कुमारने सिमन्सला तर मिथुनने हयातला तंबूत धाडले. सिमन्स एका धावेवर तर हयात २० धावा करून बाद झाला.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना खिशात घालून ही मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यासाठी भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. गोलंदाज वरुण अॅरानऐवजी अभिमन्यू मिथुनला या सामन्यात संधी देण्यात आली आहे. तर विंडीजच्या संघात मात्र काहीही बदल केलेला नाही.
First Published: Monday, December 5, 2011, 17:55