महेंद्रसिंह धोनीने घेतली जवानांची भेट - Marathi News 24taas.com

महेंद्रसिंह धोनीने घेतली जवानांची भेट

www.24taas.com, नवी दिल्ली 
 
लष्कराचे मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेल्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज शनिवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भारतीय जवानांची भेट घेतली.
 
महेंद्रसिंह  धोनीच्या भेटीमुळे सीमेवरील जवानांचा आत्मविश्वास वाढण्यास आणखी मदत होईल, असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. धोनीला गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लष्कराकडून मानद लेफ्टनंट कर्नल पद देण्यात आले होते.
 
क्रिकेटला प्रसिद्धी देण्यासाठी लष्कराकडून गेल्यावर्षी काश्मीर प्रमियर लीगला सुरुवात करण्यात आली होती. यावर्षी होणाऱ्या या लीगमधील सामन्याला धोनीने हजेरी लावली. यानंतर धोनीने जवानांची भेट घेतली. धोनी दोन दिवसांच्या या भेटीमध्ये धोनी पूंच जिल्ह्यातील हमीरपूर, राजौरी, नौशेरा, उधमपूर आणि श्रीनगरला जाणार आहे.
 

First Published: Saturday, June 2, 2012, 14:11


comments powered by Disqus