युवी फिट, लवकरच मैदानात - Marathi News 24taas.com

युवी फिट, लवकरच मैदानात

 www.24taas.com, नवी दिल्ली 
 
भारताचा धडाकेबाज आणि अष्टपैलू खेळाडू युवराजसिंग आता मैदानात  उतरण्यास सज्ज झाला आहे.  गेले अनेक महिने कर्करोगाशी झुंज देणारा युवराजसिंग आता पूर्णपणे बरा झाला आहे.
 
युवराजचे वैद्यकीय अहवाल सोमवारी हाती आले असून, तो कर्करोगापासून बऱ्यापैकी मुक्त झाला असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. युवराजच्या या अहवालामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
युवराज मागील आठवड्यातील सुमारे पाच दिवस राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होता. तेथे क्रिकेट महामंडळाच्या वैद्यकीय पथकाने त्यांच्या आरोग्याची चाचणी घेतली होती. याआधी युवराजला कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर त्याच्यावर सुरवातीचे उपचार अमेरिकेमध्ये झाले होते.
 
आपल्या आरोग्याबाबतची आनंदाची बातमी त्याने ट्विटरवरून दिली आहे. आज माझे रक्ताचे आणि स्कॅनचे रिपोर्ट आहे. आता माझी प्रकृती उत्तम आहे. नेहमीचे आयुष्य जगण्याचा मला विशेष आनंद होतो आहे, असे त्याने ट्विट केले आहे.

First Published: Tuesday, June 5, 2012, 13:09


comments powered by Disqus