Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:45
www.24taas.com, मुंबई 
राज्यसभेचा खासदार म्हणून सचिनला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठावर क्रीडाक्षेत्राशिवाय सर्वसामान्यांशी निगडित मुद्यांवर सचिनने लक्ष केंद्रित करावे. सचिनवर आता एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पूर्णत्वास नेण्याची क्षमताही त्याच्याकडे आहे सचिननं खासदार म्हणून क्रिकेटसाठीच नव्हे तर इतर खेळांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याच सचिननं सांगितलं.
मात्र लिटिल मास्टरनं सचिनला केवळ क्रीडा क्षेत्रापुरतं मर्यादीत न राहता सर्वसामान्यांशी संबंधीत विषयांबाबतही संसदेत आवाज उठवण्या सल्ला दिला. राज्यसभेचा खासदार म्हणून सचिनला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या व्यासपीठावर केवळ क्रीडाक्षेत्राशी संबंधित विषय उचलून न धरता इतर विषयांवरही बोलता येईल.
सर्वसामान्य लोकांशी निगडित,मुद्यांवर सचिनने लक्ष केंद्रित करावे. सचिन जेव्हा बोलेल तेव्हा सगळेच ऐकतील. ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती पर्ण करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळेच सचिन संसदेत क्रीडा क्षेत्राशिवाय सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कशी पार पाडतो. लिटील मास्टर यांचा हा सल्ला मास्टर-ब्लास्टर अमंलात आणतो का याकडेच साऱ्यांच लक्ष असणार.
First Published: Tuesday, June 5, 2012, 16:45