कोहली, धोनी पहिल्या पाचमध्ये - Marathi News 24taas.com

कोहली, धोनी पहिल्या पाचमध्ये

www.24taas.com, दुबई
भारतीय क्रिकेट संघाचा प्रतिभावान खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी आयसीसीच्या वन डे रॅकिंगमध्ये फलंदाजांच्या यादीत अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान पटकावले आहे.
 
 
आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या नव्या रँकिंगनुसार कोहलीला ८४६ तर धोनीला ७५२ अंक देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमला ८७१ अंक मिळवून पहिल्या स्थानावर आहे. या यादीत ६६६ अंक मिळवून गौतम गंभीर १७ व्या स्थानावर आहे.
 
 
दुसरीकडे २० जणांच्या गोलंदाजांच्या यादीत भारताच्या एकाही गोलंदाजाचे नाव नाही. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज लोनवाबो सोतसोबे प्रथम स्थानावर आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानचा सईद अझमल आणि दक्षिण आफ्रिकेचा मॉर्ने मॉर्कल याचे नाव आहे.
 
संघांच्या विचार केला तर ११७ अंक मिळवून भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे.

First Published: Tuesday, June 5, 2012, 20:54


comments powered by Disqus