टीम इंडियाचं कसं होणार? - Marathi News 24taas.com

टीम इंडियाचं कसं होणार?

झी २४ तास वेब टीम, अहमदाबाद
 
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला होम ग्राऊंडवरील ११ विजयानंतर अखेर अहमदाबादच्या मोटेरावर पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा टीम इंडियाची टॉप बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली. आणि विंडिजने विजयासह सीरिजमध्ये २-१ ने  खातं उघडलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर टीम इंडियाची फ्लॉप बॅटिंग आणि स्लॉग ओव्हर्समध्ये मार खाणाऱ्या बॉलर्समुळे टीम मॅनेजमेंटच्या चिंतेत वाढ झाली आहे.
 
कटक आणि विशाखापट्टणम वन-डेमध्ये खराब बॅटिंगनंतरही टीम इंडियाने विजय मिळवले होते. मात्र याच कामगिरीची पुनरावृत्ती अहमदाबाद वन-डेत करण्यात यंगिस्तान अपयशी ठरली. बॅट्समनकरता नंदनवन असणाऱ्या अहमदाबादच्या मोटेरावर २६१ रन्सचं लक्ष्य टीम इंडियाची कसोटी पाहणारं ठरलं. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरसारखे चॅम्पियन्स खातंही खोलू शकले नाही. होमपीचवर भारतीय बॅट्समन फ्लॉप ठरत असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फास्ट पिचेसवर या बॅट्समन्सचं काय होणार याचीच चिंता सर्वांना सतावते आहे.
 
१५ डिसेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे  सीरिजच्या इतर दोन वन-डेत भारतीय बॅट्समन आणि बॉलर्सनी कामगिरीत सुधारणा केली नाही तर भारताला प्रत्यक्ष ऑसी सीरिजमध्ये तोंडघशी पडावं लागण्याचीच अधिक चिन्ह आहेत.

First Published: Tuesday, December 6, 2011, 17:33


comments powered by Disqus