'तेंडुलकर ते सेंच्युरीकर' - Marathi News 24taas.com

'तेंडुलकर ते सेंच्युरीकर'

www.24taas.com, नागपूर
 
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीची माहिती देणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नागपुरात पार पडला. या सोहळ्याला क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी तसच सचिनचे चाहते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
 
'तेंडुलकर ते सेंच्युरीकर' असं या पुस्तकाचं नाव आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष सुधीर डबरे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. किरण महादेवकर यांनी लिहलेल्या या पुस्तकात सचिनच्या शतकांचं नेमकं वर्णन करण्यात आलं आहे.
 
सचिन तेंडुलकर यांच्यावर आजपर्य़ंत अनेक  पुस्तके लिहली गेली, त्यात पुस्तकात आता ह्या नव्या पुस्तकाची भर पडणार आहे. सचिन तेंडुलकर यांनी नुकतचं शभंर शतकांचा टप्पा पार केल्याच्या निमित्ताने हे पुस्तक प्रसिद्ध करण्याता आलं आहे.
 
 
 
 

First Published: Saturday, June 9, 2012, 10:34


comments powered by Disqus