Last Updated: Tuesday, June 26, 2012, 17:35
www.24taas.com, मुंबईमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मुलगा आता आपली इनिंग सुरू करणार आहे. अर्जुन तेंडुलकरची मुंबईच्या अंडर १४ च्या संघात वर्णी लागली आहे. संभाव्य संघात सामिल करण्यात आले असून प्रशिक्षण शिबिरात ज्युनिअर तेंडुलकर सराव करीत आहे.
गेल्या महिन्यात अर्जुनने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रायल मॅचमध्ये शतक झळकावले होते. २६ मे रोजी झालेल्या सामन्यात अर्जुनने खार जिमखानाकडून खेळताना गोरेगाव सेंटर विरोधात १२४ रन्सची दमदार खेळी केली होती. अर्जुनच्या या खेळीमुळे जिमखान्याला २१ धावांनी विजय मिळविला होता.
त्याच्या याच कामगिरीमुळे त्याची संभाव्या खेळाडूंमध्ये निवड करण्यात आलीय. अर्जुनची निवड झालेल्या अंडर-14च्या टीमचा कॅम्प 3 जुलैपासून मुंबईत सुरू होईल.
गेल्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुनने पुण्यात काडेंस ट्रॉफीमध्ये ६५ धावांची उपयुक्त खेळी केली होती.
बारा वर्षीय अर्जुन ऑल राउंडर असून तो फलंदाजी डाव्या हाताने तर गोलंदाजी उजव्या हाताने करतो. गेल्या वर्षी त्याने धीरूभाई अंबानी स्कूलकडून खेळताना जमनाबाई नारसे स्कूल विरुद्ध २२ धावा देऊन आठ विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात धीरूभाई अंबानी स्कूलचा विजय झाला होता.
First Published: Tuesday, June 26, 2012, 17:35