कॅप्टन धोनी खूश हुआ!!!!!! - Marathi News 24taas.com

कॅप्टन धोनी खूश हुआ!!!!!!

झी २४ तास वेब टीम, रांची
 
टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवागने क्रिकेट विश्वात एक नवा अध्याय लिहिला. इंदूरमध्ये विंडिजविरूद्ध झालेल्या वन-डेमध्ये सहेवागने २१९ रन्सची ऐतिहासिक इनिंग खेळली. त्याच्या या झंझावातामध्ये मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वन-डेमधील नॉट आऊट २०० रन्सचा रेकॉर्डही मोडित निघाला.
 
वीरूच्या या ऐतिहासिक इनिंगबद्दल त्याच्यावर जगभरातील क्रिकेटपटूंकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला तर सेहवाग वन-डेमध्ये नक्कीच डबल सेंच्युरी झळकावेल असा विश्वास होता. आणि सेहवागनेही त्याचा हा विश्वास खरा ठरवला आहे. सेहवाग या इतिहासाची पुनरावृत्ती करेल असा विश्वास धोनीने व्यक्त केला. वन-डेमध्ये डबल सेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम करणारे दोन्हीही बॅट्समन हे भारतीय असल्याने आपल्याला त्याचा अभिमान असल्याचही धोनीने म्हटल आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सेहवागच्या या आक्रमक इनिंगमुळे धोनी चांगलाच खुश झाला. 
 
रांची इथं झालेल्या एका कार्यक्रमात पत्नी साक्षीसह उपस्थित असलेल्या धोनीने आपला हा आनंद चक्क ढोल वाजवून व्यक्त केला. ऑस्ट्रेलिया दौ-यापूर्वी वीरूने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला असल्याने कॅप्टन धोनी आणि टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल

First Published: Saturday, December 10, 2011, 10:15


comments powered by Disqus