मनोज तिवारीनं टीम इंडियाला तारलं - Marathi News 24taas.com

मनोज तिवारीनं टीम इंडियाला तारलं

झी २४ तास वेब टीम, चेन्नई
 
विंडिजविरूद्धच्या सीरिजसाठी टीममध्ये प्रथमच संधी मिळालेल्या मनोज तिवारीने आपल्या करियरमधील पहिली-वहिली सेंच्युरी झळकावली. टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्यानंतर टीम इंडियाची इनिंग सावरत तिवारीने ही किमया केली. या शानदार सेंच्युरीसाठी त्याला 'मॅन ऑफ द मॅच'ने गौरवण्यात आलं.
 
वेस्ट इंडिजविरूद्धच्या अखेरच्या वन-डेमध्ये विनय कुमारऐवजी मनोज तिवारीला संधी देण्यात आली आणि त्यानेही मिळालेल्या संधीच सोन केलं. टीम इंडियाची ओपनिंग खराब झाल्यावर आणि गौतम गंभीरही ३१ रन्सवर आऊट झाल्यावर तिवारीने इनिंगची सूत्र हाती घेतली. टीम इंडिया अडचणीत असताना चौथ्या स्थानावर बॅटिंगला उतरलेल्या तिवारीने संयमाने आणि जबाबदारीने बॅटिंग करत टीम इंडियाची इनिंग सावरत टीम इंडियाला प्रतिष्ठित स्कोअर उभा करून तर दिलाच पण आपल्या करियरमधील पहिली-वहिली सेंच्युरीही झळकावली. मनोज तिवारीने १२६ बॉल्समध्ये १० फोर्स आणि १ सिक्सच्या मदतीने ८२.५३ च्या सरासरीने १०४ रन्सची शानदार खेळी केली.
 
चौथ्या विकेटसाठी तिवारीने विराट कोहलीबरोबर ११७ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. तिवारीने मिळालेल्या संधीचा फायदा उठवला आणि मोक्याच्या क्षणी सेंच्युरी झळकावून साऱ्यांना प्रभावित केल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी त्याला गवसलेला हा सूर पाहता वन-डे सीरीजसाठी सिलेक्शन कमिटीला आता त्याच्याही नावाचा नक्कीच विचार करावा लागेल.

First Published: Monday, December 12, 2011, 11:26


comments powered by Disqus