Last Updated: Monday, December 12, 2011, 15:59
झी २४ तास वेब टीम, मुंबई बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल ऑफ इंडियाने (बीसीसीआय) कठोर भूमिका घेत निंबस कंपनी सोबत असलेला प्रसाराणाच्या हक्का संबंधीचा करार रद्द केला. निंबसने बीसीसीआयला वेळेत पैसे न दिल्याने हे कठोर पाऊल उचलण्यात आलं तसेच दिलेली २००० कोटी रुपयांची बँक गँरटीही जप्त करण्यात आली आहे. निंबसचा करार संपण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच तो रद्द करण्यात आला आहे. या संबंधीची निर्णय बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. निंबसने याआधीही बीसीसीआयचे पैसे वारंवार थकवल्याने करार रद्द करण्या संबंधी एकमत झालं.
निंबसने ऑक्टोबर २००९ मध्ये बीसीसीआय सोबत चार वर्षासाठी तब्बल २००० कोटी रुपयांचा करार केला होता. निंबसने सोमवारी २४ कोटी रुपये बीसीसीआयला भरले पण तरीही ८८ कोटी रुपयांची थकबाकी होती. आता पर्यंत एकदाही निंबसने वेळेवर पैसे अदा केले नाहीत त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.
-
First Published: Monday, December 12, 2011, 15:59