टेस्ट क्रिकेटसाठी 'द वॉल' सरसावला... - Marathi News 24taas.com

टेस्ट क्रिकेटसाठी 'द वॉल' सरसावला...

www.24taas.com, मुंबई
 
आगामी दहा वर्षांमध्ये टेस्ट क्रिकेटचं अस्तित्व धोक्यात येईल असा इशारा राहुल द्रविडने दिलाय. भविष्यात टेस्ट क्रिकेट टीकवण्यासाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागणार असून त्यासाठी आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे, असं मत द्रविडने व्यक्त केलंय.
 
टेस्ट क्रिकेट म्हणजे क्रिकेटचा आत्मा आहे. मात्र, आजच्या फटाफट क्रिकेटच्या जमान्यात टेस्ट क्रिकेटच महत्त्व कमी होत चाललंय, हे नाकारून चालणार नाही. खुद्द राहुल द्रविडनेच आगामी काळात टेस्ट क्रिकेटचं अस्तित्वच धोक्यात येईल, असा इशारा दिलाय.
 
सध्याचे साऱ्याच युवा क्रिकेटपटूंचा कल हा टी-20 क्रिकेटकडे आहे. यामुळेच टेस्ट क्रिकेटची प्रतिष्ठा राखण्यासाठी आता संघर्ष करण्याची गरज असल्याचं त्याचं म्हणण आहे. आगामी दहा वर्षांनंतर टेस्ट क्रिकेट वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा आतापासूनच याबाबत विचार होणं गरजेच असल्याचंही त्यानं सांगितलंय. आता खुद्द 'द वॉल'नेच टेस्ट क्रिकेटची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचा इशारा दिलाय. म्हणूनच टेस्ट क्रिकेटसाठी ही धोक्याचीच घंटा आहे असचं म्हणावं लागेल.
 
 

First Published: Thursday, July 5, 2012, 17:38


comments powered by Disqus