एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला- सेहवाग - Marathi News 24taas.com

एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कप नाही जिंकला- सेहवाग

www.24taas.com, मुंबई
 
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.
 
'एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय मिळवला नाही, तर संपूर्ण टीम यामागे होती', असं सेहवागनं म्हटलं आहे. 'धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय नाही.' 'वर्ल्ड कपचा विजय संपूर्ण टीममुळे' झाला आहे. त्यामुळे टीम इंडियातील या दिग्गजांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीने काही सिनियर्स खेळाडूंच्या स्लो फिल्डिंगवर ताशेरे ओढले होते. तेव्हा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला वीरेंद्र सेहवागनं उत्तर दिल्यानं टीम इंडियातील वाद दिसून आले होते. धोनी आणि सेहवाग यावरुन आमनेसामने आले आहेत. धोनीनं सीनिअर्संना सुस्त म्हटल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं पलटवार करत सीनिअर्स सुस्त नसल्याचं म्हटलं होतं.
 
मी स्वत: गेल्या १० वर्षांपासून चांगली फिल्डींग करत असल्याचं सेहवागनं म्हटलं होतं. सिनिअर्स खेळाडुंच्या स्लो फिल्डींगमुळं ज्युनिअर खेळाडूंना जास्त रन्स बनवावं लागतात असं धोनीने म्हटलं होतं.
 
संबंधित बातम्या
 
---
 
‘टीम इंडिया’तील वाद ‘रोटेशन पॉलिसी’मुळे

‘टीम इंडिया’तील वाद ‘रोटेशन पॉलिसी’मुळे
टीम इंडियात वाद फक्त सिनियर्स प्लेअर्सच्या फिल्डिंगबाबत धोनीनं केलेल्या वादग्रस्त विधानामुळेच नाही तर रोटेशन पॉलिसीवरूनही आहे. वीरूनं धोनीच्या रोटेशन पॉलिसवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.


 
---
 
धोनी, सेहवागचा वाद चव्हाट्यावर

धोनी, सेहवागचा वाद चव्हाट्यावर
भारताचा सुरू असलेला ऑस्ट्रेलिया दौरा भारताला काही फलदायी ठरत नाहीये असचं दिसतं आहे. लागपोठ दोन वनडे मॅचमध्ये पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.


 
---
 
 
 

First Published: Friday, July 6, 2012, 16:44


comments powered by Disqus