सचिनचे योग्यवेळी पुनरागमन – सेहवाग - Marathi News 24taas.com

सचिनचे योग्यवेळी पुनरागमन – सेहवाग

www.24taas.com, नोएडा
श्रीलंकेच्या मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने विश्रांती घेतली असली तरी, तो योग्यवेळी काही ठराविक मालिकांमध्ये पुनरागमन करेल, असे तडकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने सांगितले आहे.
 
नोएडा येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सेहवाग म्हणाला, मलाच नाही तर संपूर्ण क्रिकेट जगताला सचिनची या मालिकेमध्ये आठवण येणार आहे. सचिन आता ३९ वर्षांचा झाला आहे, हे माझ्या सोबत सर्वांना माहित आहे. त्यामुळे तो काही निवडक मालिकांमध्येच खेळेल असे सेहवागने सांगितले आहे. तो न्युझीलंडविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
 
सध्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघात चांगले खेळाडू आहेत. "आयपीएल'मधील बहुतेक सामने मी खेळलो आहे. त्यामुळे माझ्या तंदुरूस्तीचा प्रश्न मिटलेला आहे. श्रीलंकेतील मालिकेचा पुढील विश्वकरंडक ट्वेंटी-20 साठी चांगलाच उपयोग होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
 
टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी केली आहे. मैदानावर नाही तर मैदानाबाहेर, टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याला विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा टार्गेट केलं आहे.
 
‘एकट्या धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय मिळवला नाही, तर संपूर्ण टीम यामागे होती’, असं सेहवागनं म्हटलं आहे. ‘धोनीमुळे वर्ल्ड कपचा विजय नाही.’ ‘वर्ल्ड कपचा विजय संपूर्ण टीममुळे’ झाला आहे. त्यामुळे टीम इंडियातील या दिग्गजांचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात धोनीने काही सिनियर्स खेळाडूंच्या स्लो फिल्डिंगवर ताशेरे ओढले होते. तेव्हा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीला वीरेंद्र सेहवागनं उत्तर दिल्यानं टीम इंडियातील वाद दिसून आले होते. धोनी आणि सेहवाग यावरुन आमनेसामने आले आहेत. धोनीनं सीनिअर्संना सुस्त म्हटल्यानंतर वीरेंद्र सेहवागनं पलटवार करत सीनिअर्स सुस्त नसल्याचं म्हटलं होतं.
 
गेल्या १० वर्षांपासून चांगली फिल्डींग करत असल्याचं सेहवागनं म्हटलं होतं. सिनिअर्स खेळाडुंच्या स्लो फिल्डींगमुळं ज्युनिअर खेळाडूंना जास्त रन्स बनवावं लागतात असं धोनीने म्हटलं होतं.

First Published: Friday, July 6, 2012, 16:49


comments powered by Disqus