Last Updated: Saturday, July 7, 2012, 07:28
www.24taas.com, नोएडा 
'वर्ल्डकप धोनीमुळे जिंकलो नाही, तर टीम चांगली होती. आणि त्यामुळेच वर्ल्डकप जिंकलो आहोत.' असं खळबळजनक वक्तव्य करणाऱ्या सेहवागने आता कोलांटउडी मारली आहे. ट्विटरवर ट्विट करून त्याने त्याच्या वक्तव्याबाबत सारवासारव केली आहे.
सेहवागने या सर्व प्रकाराचं खापर मीडियावर फोडलं. आपला संघ उत्तम होता म्हणून धोनीच्या नेतृत्त्वाखाली आपण दोन विश्वचषक जिंकले एवढंच मला म्हणायचं होतं. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करणं चुकीचं आहे. टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर सेहवागने केलेली टीका, आणि त्या टीकेची प्रसिद्धीमाध्यमांनी घेतलेली दखल हे पाहताचवीरेंद्र सेहवागने असं काहीच म्हणायचं नव्हतं असं स्पष्ट केले आहे.
धोनी हा उत्तम कॅप्टन आहे. आणि भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये त्याचा समावेश होतो, असं त्याने ट्विटरवर म्हटलं आहे. मीडियाने माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. दरम्यान, महेंद्रसिंग धोनीला लाभलेला बलाढ्य संघ हेच त्याच्या कर्णधारपदाच्या यशाचं गमक असल्याचं मत वीरेंद्र सेहवागने व्यक्त केलं होतं.
First Published: Saturday, July 7, 2012, 07:28