लहानग्या मुशीरचा रेकॉर्ड... - Marathi News 24taas.com

लहानग्या मुशीरचा रेकॉर्ड...


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
गाईल्स शिल्डमध्ये सर्वात लहान क्रिकेटपटू म्हणून पदार्पण केलेल्या साडेसहा वर्षांच्या मुशीर खानने पहिल्याच मॅचमध्ये कमाल केली आहे. पहिल्याच मॅचमध्ये मुशिरने ८ ओव्हर्समध्ये १.४ च्या इकॉनॉमीने ११ रन्स देत ६ विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्याने ५ ओव्हर्स या मेडन टाकल्या. पदार्पणात अशी कामगिरी करणाराही तो सर्वात लहान क्रिकेटपटू ठरला आहे.
 
मुंबईच्या अंजुमन इस्लाम शाळेकडून साडेसहा वर्षांच्या मुशीरने शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी शाळेविरूद्ध ही कामगिरी केली आहे. गाईल्स शिल्डच्या ११४ वर्षांच्या इतिहासात अशा प्रकारची कामगिरी करणारा मुशीर पहिला सर्वात लहान क्रिकेटपटू ठरला आहे. मुशीरच्या या कामगिरीच्या जोरावर अंजुमन इस्लाम शाळा शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीला पराभूत करू शकली. विशेष म्हणजे हॅरिस शिल्डमध्ये ४३९ रन्सची विक्रमी खेळी करणाऱ्या सर्फराजचा मुशीर हा लहान भाऊ आहे.

First Published: Wednesday, December 14, 2011, 10:18


comments powered by Disqus