Last Updated: Wednesday, December 14, 2011, 10:31
झी २४ तास वेब टीम, मुंबई भारताच्या दोन दिग्गज माजी क्रिकेटपटूंनी बीसीसीआयवर हल्ला चढवलाय. माजी क्रिकेटपटून सुनिल गावस्कर आणि अनिल कुंबळे यांनी बीसीसीआय टीका केलीय.
सुनिल गावस्कर यांनी तर आपला बीसीसीआयवरील विश्वासच उडाला आहे असं म्हटलं आहे. मीडिया आणि आयपीएलच्या कामासाठी प्रत्येक सीझनसाठी ५ कोटींची मागणी धुडकावल्यावर गावस्कर यांनी हे उद्गार काढले आहेत. बीसीसीआयने आपले पैसे देण्यास नकार दिल्याने व्यथित होऊन गावस्कर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तर दुसरीकडे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी नॅशनल क्रिकेट अॅकाडमीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला नामधारी अध्यक्ष होण्यात काहीही रस नसून आपल्या कोणत्याच योजनेला इतर समिती सदस्यांकडून पाठिंबा मिळत नसल्याच सांगून कुंबळे यांनी हा राजीनामा दिला आहे.
मात्र कुंबळेचा हा दावा बीसीसीआयने फेटाळून लावला आहे. अशा प्रकारे टीम इंडियाचे हे दोन दिग्गज क्रिकेटपटू आणि बीसीसीआयमध्ये वाद सुरू आहेत
First Published: Wednesday, December 14, 2011, 10:31