टीम इंडियाची भिस्त असणार 'भिंती'वर!!!!! - Marathi News 24taas.com

टीम इंडियाची भिस्त असणार 'भिंती'वर!!!!!

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
मिशन ऑस्ट्रेलियामध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा सर्वात प्रमुख मोहरा असणार राहुल द्रविडवर टीम इंडियाचा सर्वाधिक विश्वास आहे.. टीम अडचणीत असताना राहुलनं अनेकवेळा मोठ्या खेळी साकरल्या आणि टीम इंडियासाठी तारणहार ठऱला.
 
मॅच घरच्या मैदानावर असो वा परदेशात द्रविडच्या खेळीवर कोणताच परिणाम होतं नाही. इंग्लंड दौऱ्यात भारताचे दिग्गज बॅट्समन अपयशी ठरत असताना द्रविडनं मात्र जिगरबाज बॅटिंग केली आहे.
 
ऑस्ट्रेलियातही द्रविडचा रिकॉर्ड दमदार आहे द्रविडने ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये ४९ च्या सरासरीनं रन्स केले आहेच. त्यानं १२ टेस्ट मॅचेसमध्ये १ सेंच्युरी झळकावताना कांगारुंविरुद्ध ९७२ रन्स केलेले आहेत.राहुलकरता ऑस्ट्रेलियाचा हा अखेरचा दौरा आहे. त्यामुळेच या दौऱ्यात टीम इंडियाला कांगारुविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी तो सज्ज झाला आहे

First Published: Thursday, December 15, 2011, 07:39


comments powered by Disqus