Last Updated: Monday, July 16, 2012, 16:27
www.24taas.com, मुंबई पाच वर्षानंतर होत असलेल्या भारत पाक क्रिकेट सीरिजला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं विरोध केलाय. पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळवण्याबाबत बीसीसीआयनं फेरविचार करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी केली आहे.
काँग्रेसबरोबरच शिवसेनेनंही या सामन्यांना आक्षेप घेतलाय. पाकबरोबर क्रिकेट सामने आयोजित करणं लाजिरवाणी बाब असल्याचं शिवसेना नेते रामदास कदमांनी म्हटलंय. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर लोकभावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळं जनता सामने खेळविण्याच्या विरोधात आहे.
या सामन्यांबाबत लोकभावनेचा विचार व्हावा आणि लोकभावना लक्षात घेऊन बीसीसीआयनं फेरविचार करावा. अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केलीय.
First Published: Monday, July 16, 2012, 16:27