Last Updated: Wednesday, July 18, 2012, 10:50
www.24taas.com, चेन्नई 
बीसीसीआयने पाकिस्तानविरूद्धच्या मालिकेला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर हिंदुस्थानातील कानाकोपर्यात नाराजीचे सूर उमटले असतानाच हिंदुस्थान क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू असल्याकारणाने याप्रसंगी भावनांना थारा नाही. त्यामुळे इतर देशांप्रमाणे पाकिस्तानविरूद्धही खेळण्यासाठी आम्ही ‘रेडी’ आहोत, असे मत त्याने व्यक्त केले. सरावात पावसाचा व्यत्यय हिंदुस्थानचा क्रिकेट संघ पाच वन डे आणि एक ट्वेण्टी-२० सामना खेळण्यासाठी श्रीलंकन दौर्यावर जाणार आहेत.
यासाठी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सराव शिबीराच्या दुसर्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळाडूंना नियोजित वेळेपूर्वीच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. बुधवारी हिंदुस्थानी संघ श्रीलंकेसाठी रवाना होणार असून २१ जुलै रोजी उभय संघांमधील पहिला सामना खेळविण्यात येणार आहे.
First Published: Wednesday, July 18, 2012, 10:50