अमिताभ, करिना आयपीएलचा डान्स अश्लील - Marathi News 24taas.com

अमिताभ, करिना आयपीएलचा डान्स अश्लील

www.24taas.com, चेन्नई
 
ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटपटू डग बॉंलिंजर आयपीएल-५ च्‍या शुभारंभावेळी केलेल्‍या परफॉर्मन्‍समुळे तीन महिन्‍यानंतर अडचणीत आला आहे. मद्रास हायकोर्टाने त्‍याच्‍याविरोधात नोटीस पाठविली आहे. सार्वजनिक कार्यक्रमावेळी अश्‍लील नृत्‍य केल्‍याप्रकरणी आयपीएल कमिशनर राजीव शुक्‍ला, अमेरिकन पॉप स्‍टार केटी पेरी, ऑस्‍ट्रेलियन क्रिकेटर डग बोलिंजर आणि सोनी सेट मॅक्‍सच्‍या अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
 
तसेच अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान, करीना कपूर आणि प्रियांका चोप्राला इंडियन प्रीमिअर लीगच्या पाचव्या पर्वात परफॉर्म करणे महागात पडले आहे. या चौघांवर आयपीएल -५ मध्ये अनसेंसॉर्ड आणि अश्लील नृत्य केल्याचा आरोप एका याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणात आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला, अमेरिकन पॉप स्टार केटी पेरी आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डग बोलिंजर आणि सेनी सेट मॅक्सचे अधिकारी यांनाही ही नोटीस बजावली आहे.
 
सोनी सेट मॅक्स वाहिनीने कोणत्याही प्रकारचे एडिटिंग न करता आयपीएलचे थेट प्रसारण केले होते. शिवाय या टीव्ही क्लिपिंग्सही वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या होत्या. आयपीएलच्या दरम्यान मुलांच्या परीक्षा सुरु होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाल्याचे याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
 
 
 

First Published: Thursday, July 19, 2012, 16:35


comments powered by Disqus