Last Updated: Tuesday, July 31, 2012, 11:25
www.24taas.com, कोलंबो 
भारत आणि श्रीलंका यांच्यातील चौथी वन-डे कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. भारतानं ही मॅच जिंकली तर सीरिजमध्ये विजयी आघाडी घेण्याची संधी धोनी अँड कंपनीसमोर असणार आहे.
भारत पाच वन-डे मॅचेसच्या सीरिजमध्ये २-१ नं आघाडीवर आहे. भारतीय बॅट्समन सीरिजमध्ये तुफान फार्मात आहेत. मात्र, बॉलर्सची कामगिरी अपेक्षित झालेली नाही. त्यांना या मॅचमध्ये आपली कामगिरी सुधारावी लागणार आहे. तर दुसरीकडे लंकन टीमला सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी ही मॅच महत्वाची ठरणार आहे.
कुमार संगकारा आणि तिलकरत्ने दिलशान भारतीय टीमसाठी धोकादायक ठरु शकतात. दोन्ही टीम्स विजयाच्या उद्देशानचं मैदानात उतरणार असल्यानं क्रिकेटप्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणीच ठरणार आहे.
First Published: Tuesday, July 31, 2012, 11:25