Last Updated: Tuesday, July 31, 2012, 23:18
www.24taas.com, कोलंबो 
भारत-श्रीलंका यांच्यात चौथा वनडे सामना सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळविल्यास मालिकाही जिंकणार आहे. ३० ओव्हरमध्ये श्रीलंकेने १४२ रन केल्या आहेत.
लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. थरंगा आणि दिलशानने श्रीलंकेला चांगली सुरुवात करून दिली. लंकेला पहिला धक्का अशोक डिंडाने दिला. दिलशान ४२ रन करून बाद झाला. तर आर.अश्विनने श्रीलंकेचा दुसरा फलंदाज उपुल थरंगा याला बाद केले. कोलंबोच्या मैदानावर वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ ४७ वेळेस आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ ३० वेळेस विजयी झाला आहे.
या वनडे मालिकेतील आपले स्थान कायम ठेवण्यासाठी श्रीलंकेला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे. भारताने आजचा सामना जिंकला तर ही वनडे मालिका भारताच्या खिश्यात जाईल. भारतीय संघात राहुल शर्माच्या जागेवर मनोज तिवारीला संधी देण्यात आली आहे.
First Published: Tuesday, July 31, 2012, 23:18