Last Updated: Saturday, August 4, 2012, 20:46
www.24taas.com, पल्लेकल भारताने ३५ षटकात ३ बाद १८० धावा केल्या आहेत. गौतम गंभीर ८८ धावांवर आऊट झाला. मनोज तिवारी ५३ धावावर खेळत आहे. श्रीलंकेच्या एन. प्रदीपने आपल्या तीन षटकात २ गडी टिपताना १७ दिल्या आहेत.
मायक्रोमॅक्स कपमधील पाचव्या व अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग जखमी असल्याने त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. संघात तो नसल्याने अजिंक्य रहाणेला सलामीला पाठविण्यात आले होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून परेराच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर त्याच्या जागेवर विराट कोहली खेळायला आला.
गौतम गंभीरने आक्रमक फलंदाजी करीत ४९ चेंडूत ७ चौकारासह अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने त्याला साथ देण्याचा प्रयत्न केला मात्र दोन चौकारासह २३ धावा केल्यावर प्रदीपने त्याला पायचीत केले. त्यानंतर खेळायला आलेल्या रोहित शर्मालाही प्रदीपने अवघ्या चार धावावर बोल्ड केले.
आज गंभीरने महेला जयवर्धनेच्या जागी कर्णधारपद संभाळत असलेल्या मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर हल्ला चढविला. त्याच्या तीन षटकात कोहली-गंभीर जोडीने २४ धावा लुटल्या.
First Published: Saturday, August 4, 2012, 20:46