Last Updated: Monday, December 19, 2011, 15:50
झी २४ तास वेब टीम, मुंबईसौरव गांगुली आणि एकेकाळचे भारतीय कोच ग्रेग चॅपेल यांच्यातला वाद सर्वश्रृत आहे. आता सौरवने ग्रेग चॅपेल मॅड आहेत असं विधान करुन तो आणखीन चिघळवला आहे. ग्रेग निवड समिती सदस्य तसंच ऑस्ट्रेलियन सेंटर ऑफ एक्सिलन्स अकाडमीचा मुख्य होता पण तिथूनही त्याला बाहेर हाकलवण्यात आल्याचं सौरव म्हणाला. ग्रेग चॅपेल भारतात आले तेंव्हा आपली मानसिकता ऑस्ट्रेलियन असल्याने इथे काम करु शकत नसल्याचं म्हणाले होते पण तिथेही त्यांना काम करणं जमलं नाही. हे कमी की काय सौरव म्हणाला की चॅपेल हे प्रत्येक कोचिंग कामगिरीत अपयशी ठरले आहे आणि दोष त्यांच्यातच असल्याचा हा पुरावा आहे.
भारत विरुद्धच्या येत्या टेस्ट सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सचिन तेंडूलकर आणि भारतीय फलंदाजांचे दोष दाखवून देऊ असं चॅपेल म्हणाल्याचे वृत्त आहे. गांगुली पुढे म्हणाला की लोकांच्या हे लक्षात आलं पाहिजे की दोष चॅपेल यांच्यातच आहे. चॅपेल पुन्हा पुन्हा त्याच चुका करतात आणि त्यामुळेच तो माणूस मॅड असला पाहिजे.
First Published: Monday, December 19, 2011, 15:50