Last Updated: Wednesday, December 21, 2011, 07:37
झी २४ तास वेब टीम, मेलबर्न भारताविरुद्ध २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल करण्यात आला आहे. संघात नव्याने इडी कोवान आणि शॉन मार्श यांचा समावेश करण्यात आला आहे.
टास्मानिया संघाकडून सलामीला खेळणाऱ्या कोवान ऑस्ट्रेलिया संघात पदार्पण करीत आहे. तर पश्चिम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शॉन मार्शने आपली तंदुरुस्ती सिद्ध केल्याने त्याची संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया संघातील युवा जलदगती गोलंदाजांच्या जोडीला अनुभवी बेन हिल्फेनहॉसची संघात निवड करण्यात आली आहे.
कोवानने भारताविरुद्धच्या सराव सामन्यात शतक झळकाविल्याने त्याची संघात निवड झाली आहे. तर फिलीप ह्युजेस आणि उस्मान ख्वाजा यांना संघातून वगळण्यात आले आहे. शेन वॉटसन आणि रायन हॅरिस यांना दुखापतीमुळे पहिल्या कसोटीतून बाहेर बसावे लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ - मायकल क्लार्क (कर्णधार), इडी कोवान, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, मायकल हसी, डॅनियल ख्रिश्चन, ब्रॅ़ड हॅडिन, पिटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, मिचेल स्टार्क आणि नॅथन लिऑन.
First Published: Wednesday, December 21, 2011, 07:37