Last Updated: Wednesday, December 21, 2011, 09:52
झी २४ तास वेब टीम 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये झहीर खान टीम इंडियाच्या फास्ट बॉलिंगचा प्रमुख आधारस्तंभ असणार आहे. मात्र प्रॅक्टिस मॅचमध्ये झहीरला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही. त्यानं बॉलिंगही टप्प्याटप्प्यामध्ये केली. त्यामुळे त्याच्या फॉर्म आणि फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभ राहीलं आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर झहीर खाननं आपल्या फिटनेसवर मेहनत घेतली. आणि ऑस्ट्रेलियाच्या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तो सज्ज झाला. त्यानं रणजीमध्ये आपला फिटनेस सिद्ध केला. मात्र त्याला आपल्या मुंबई टीमसाठी चमकदार कामगिरी करता आली नाही. फिटनेस सिद्ध केल्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला.
मात्र, पहिल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये तो खेळला नाही. त्याच्या न खेळण्याच कुठलंही कारण टीम मॅनेजमेंटन स्पष्ट केलं नाही. दुसऱ्या प्रॅक्टिस मॅचमध्ये तो खेळला खरा मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही. मनूका ओव्हलच्या फास्ट बॉलिंगला साथ देणाऱ्या पीचवर त्याला आपल्या बॉलिंगची छाप सोडता आली नाही.
प्रॅक्टिस मॅचमध्ये तर तो फार थोडावेळ मैदानावर उपस्थित होता. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उभ राहणं सहाजिकच आहे. झहीर भारताच्या विजयात नेहमीच मोलाची भूमिका बजावत आला आहे. मात्र फॉर्म आणि फिटनेससाठी तो झगडतांना दिसतो आहे.
First Published: Wednesday, December 21, 2011, 09:52