पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम - Marathi News 24taas.com

पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

झी २४ तास वेब टीम, पुणे
 
पुणे तिथे काय उणे... असं नेहमीच म्हटलं जातं आता याच पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं नवं स्टेडियम उभारण्यात आलं आहे, या स्टेडियमचा शुभारंभ हा पार पडला तो पहिली मॅच खेळवूमन. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीच्या पहिल्या स्टेडियमवर पहिली मॅच खेळविण्यात आली.
 
पुण्याजवळील गहूंजे इथं साकारण्यात आलेल्या या स्टेडियमवर पहिली मॅच झाली ती महाराष्ट्र विरुद्ध हिमाचल प्रदेश या रणजी मॅचनं. यावेळी माजी कसोटीवीर चंदू बोर्डे,महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अजय शिर्के, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या उपस्थितीत खेळपट्टीची पूजा करण्यात आली.
 
सुमारे चार एकरवर हे स्टेडियम उभारण्यात आलं आहे. या स्टेडियमची क्षमता ५५ हजार एवढी आहे. आयपीएलमधील पुणे वॉरियर्स टीमचं हे होम ग्राऊंड असणार आहे. या स्टेडियमुळे क्रिकेटविश्वात आता पुण्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
 

First Published: Wednesday, December 21, 2011, 11:44


comments powered by Disqus