ब्रॅडमनपेक्षा सचिन सर्वश्रेष्ठ - Marathi News 24taas.com

ब्रॅडमनपेक्षा सचिन सर्वश्रेष्ठ

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न  
 
क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाचे महान बॅट्समन सर डॉन ब्रॅडमन आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर या दोघांपैकी कोण श्रेष्ठ याची चर्चा सुरु असते.  मात्र सचिन हाच सर्वश्रेष्ठ बॅट्समन आहे असा निष्कर्ष ऑस्ट्रेलियाच्याच एका संख्याशास्त्रज्ञाने काढला आहे.
 
 
ग्रिफिथ विद्यापीठातील शास्त्रज्ञ  निकोलस -होड यांनी संख्या शास्त्र सिध्दांताचा वापर करुन दोन्ही बॅट्समननं खेळलेल्या मॅचच्या आधाराने हा निष्कर्ष काढलाय. सचिननं १८४  टेस्टमध्ये १५ हजार १८३  रन्स केलेत तर ब्रॅडमन यांनी ५२ टेस्टमध्ये ६  हजार ९९६ रन्स केलेत. त्यांच्या सिध्दांतानुसार सचिन ब्रॅडमनच्या पुढे आहे.
 
 
ग्रिफिथ विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. निकोलस रोहडे यांनी संख्याशास्त्र सिद्धान्ताचा वापर करून या दोन्ही फलंदाजांनी खेळलेल्या काळाच्या आधारावरून हा निष्कर्ष काढला आहे. सोमवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी हा निष्कर्ष आल्याने क्रिकेटप्रेमींमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
 
ब्रॅडमन यांचे २००१ मध्ये ९२ व्या वर्षी निधन झाले. रोहडे यांच्या सिद्धान्तानुसार, तेंडुलकर ब्रॅडमन यांच्या पुढे आहे. या दोघांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर ही बाब समोर येते. रोहडे यांनी हा सिद्धान्त मांडताना या दोन्ही खेळाडूंच्या एकूण धावा, त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा कालावधी आणि त्यांनी खेळलेले डाव यांचा अभ्यास केला आहे.
 
या दोन्ही खेळाडूंच्या कारकिर्दीतील विविध टप्प्यांची अर्थपूर्ण तुलता करून आपण हे मत नोंदविले असल्याचे डॉ. रोहडे यांनी स्पष्ट केले. हा एक संवेदनशील विषय आहे आणि कसोटी क्रिकेटप्रेमींच्या दृष्टीने तो नेहमीचा वादाचा विषय ठरला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
ऍलन बॉर्डर (सातवे स्थान),  स्टीव्ह वॉ (दहावे) हे अन्य ऑस्ट्रेलियन फलंदाज टॉप टेनमध्ये असून, राहुल द्रविड (चौथ्या स्थानावर) आणि सुनील गावसकर (आठवे) या अन्य भारतीय फलंदाजांचाही यामध्ये समावेश आहे.
 

 
 
 

First Published: Friday, December 23, 2011, 09:07


comments powered by Disqus