ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर - Marathi News 24taas.com

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ जाहीर

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न
 
भारत आणि  ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून कसोटी सामन्यांना सुरूवात होत आहे.  पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. संघाचे नेर्तृत्व मायकल क्लार्क करणार आहे.
 
अनुभवी बेन हिल्फेनहॉसला अंतिम संघात स्थान देण्यात आले आहे. हिल्फेनहॉस याच्यासह जेम्स पॅटिन्सन आणि पिटर सिडल हे जलदगती गोलंदाज संघात असणार आहेत. तर नॅथन लिऑन हा एकमेव फिरकीपटूला संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात इडी कोवान आणि डेव्हिड वॉर्नर  हे करतील. तर मिचेल स्टार्कला हा बारावा खेळाडू म्हणून संघात आहे.
 
सोमवार २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने अंतिम अकरा खेळाडूंची निवड केली आहे. यात खालील टीमचा समावेश आहे.
 
संघ पुढीलप्रमाणे - मायकल क्लार्क (कर्णधार), इडी कोवान, डेव्हिड वॉर्नर, शॉन मार्श, रिकी पाँटिंग, मायकल हसी, ब्रॅ़ड हॅडिन, पिटर सिडल, जेम्स पॅटिन्सन, बेन हिल्फेनहॉस, नॅथन लिऑन आणि मिचेल स्टार्क (बारावा खेळाडू).

First Published: Saturday, December 24, 2011, 09:34


comments powered by Disqus