इम्रान खान आता 'बेटींगमध्ये महान' - Marathi News 24taas.com

इम्रान खान आता 'बेटींगमध्ये महान'

झी 24 तास वेब टीम.
 
पाकिस्तान आणि फिक्सिंग यांच नातं अगदी जन्मोजन्मीच म्हंटल पाहिजे. फिक्सिंगच्या जाळ्यात अडकल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची चांगलीच नाचक्की होते आहे. त्यात आता पाकिस्तानला वर्ल्ड विजेतेपद मिळवून देणारा कॅप्टन इम्रान खाननं आपण आपल्या मेहुण्याला बेटिंगच्या टिप्स दिल्या होत्या अशी धक्कादायक कबुली दिली आहे.
 

अपर्सनल हिस्ट्री या नव्या पुस्तकात इम्रानने ही कुबली दिली आहे. आपल्यावरील कर्जाचा डोंगर कमी कऱण्यासाठी आपण हा मार्ग पत्कारल्याचं इम्राननं सांगितलं  आहे. या बेटिंगमध्ये जो पैसा मिळाला त्यातून आपल्या राजकिय पक्षाचे कर्ज चुकते केल्याचं इम्राननं सांगितलं आहे.
 
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिके दरम्यानच्या टेस्ट सीरिज दरम्यान पत्नी जेमिमा गोल्डस्मि हिचा भाऊ बेन गोल्डस्मिथला बेटिंग करत होती. तेव्हा नेमकी कशावर बेटिंग करायची याची टिप्स इम्राननं आपल्या मेव्हण्याला दिल्या अशी कबुली इम्रानन दिली आहे.  इम्रानच्या या कबुलीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात नव्यानं वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

First Published: Sunday, October 9, 2011, 12:07


comments powered by Disqus