'मेलबर्न' मध्ये टीम इंडिया 'बर्न' - Marathi News 24taas.com

'मेलबर्न' मध्ये टीम इंडिया 'बर्न'

झी २४ तास वेब टीम, मेलबर्न
 
बॉक्सिंग-डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं ठेवलेल्या २९२ रन्सचा पाठलाग करतांना टीम इंडियाची टॉप ऑर्डर 70 रन्सच्या आतच पॅव्हेलियनमध्ये परतली.
 
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला कांगारुंच्या तेज माऱ्यासमोर काहीच कमाल करता आली नाही. विराट कोहलीला तर खातही उघडता नाही. बेन हिलफेनहॉस, जेम्स पॅटिनसन आणि पीटर सिडलनं टीम इंडियाची दाणादाण उडवून टाकली.
 
सचिन तेंडुलकरही फारशी कमाल करु शकला नाही. तो ३२ रन्सवर पीटर सिडलच्या बॉलिंगवर आऊट झाला. आणि भारताच्या उरल्या-सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. भारताला मेलबर्न टेस्टमध्ये विजयाची नामी संधी होती. मात्र, टॉप ऑर्डर फ्लॉप ठरल्यानं भारतानं ही संधीही गमावली आहे.

First Published: Thursday, December 29, 2011, 15:07


comments powered by Disqus