Last Updated: Thursday, January 5, 2012, 21:16
www.24taas.com,सिडनीसिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटप्रेमींना मधलं बोट दाखविल्यामुळे भारताच्या मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीच्या मॅच फीमधून ५०% रक्कम कापण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी विराटचे समर्थन केले आहे.
विराटने टीकेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. टीकाकारांना तुम्ही नेहमी चुकीचे ठरविले पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात. आम्ही तुमचे समर्थन करतो. फक्त छान खेळ करा आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे बिग बी यांनी ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर म्हटले आहे.
मी अशी कृती करण्यापूर्वी प्रेक्षकांनी मला विनाकारण त्रास दिला होता. मला माहिती आहे, की खेळाडूंनी अशी प्रतिक्रिया देऊ नये. परंतु, तुमच्या आई-बहिणीबद्दल जर कोणी वाईट बोलत असेल तर अशा वेळी तुमचा तोल जातो, असे समर्थन कोहलीने ट्विटरवर केले होते.
त्याने, अशी वर्तणूक केल्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. भारतीय बॉलर्सना कांगारुंना रोखण्यात अपयश येत होतं. त्यावेळी विराट कोहली बाऊंड्री लाईनजवळ फिल्डिंग करत होता. यावेळी क्रिकेटप्रेमींनी त्याला जाणूबूजून छेडलं. या साऱ्या प्रकारामुळे चिडलेल्या विराटनं आपल्या हाताचं मधलं बोट दाखवलं होतं. दरम्यान, कोहलीनं आपली बाजू स्पष्ट केली आहे. जर कुणी तुम्हाला आपल्या आई-बहिणींवरुन शिव्या देत असेल. तर साहजिकच तुम्ही गप्प बसू शकत नाही. त्यांनी वापरलेले शब्द अतिशय वाईट होते. त्यामुळेच मी अशी वर्तणूक केल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.
इंग्लडचा माजी कॅप्टन आणि एकेकाळी आयपीएलमधील टीम रॉयल चैलेंजर्स बेंगळुरू मध्ये कोहली सोबत खेळणाऱ्या केविन पीटरसनने ट्विटरवर कोहलीबाबत सहानुभूती दाखवली आहे. त्यांने म्हटंल आहे की, ऑस्ट्रेलियात तुमचं असचं स्वागत केलं जातं, तुम्ही त्यांना हरवून त्यांना अपमानित करणं सुरू करा.
First Published: Thursday, January 5, 2012, 21:16