टीम इंडियाची आगेकूच, सचिनकडे लक्ष - Marathi News 24taas.com

टीम इंडियाची आगेकूच, सचिनकडे लक्ष

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

www.24taas.com , सिडनी
 
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने पहिला डाव चार गडी बाद ६५९ धावांवर घोषित केल्यानंतर टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. मात्र, गौतम गंभीरने गंभीर खेळी करत ८३ धावा फटकावताना टीम इंडियाची बाजू सावरली. गंभीरची विकेट गेल्यानंतर सचिन तेंडुलकर (७५ रन्स) आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (५८ रन्स) या जोडीने नेटाने किल्ला लढवला आहे. आता सचिनच्या महाशतकाकडे लक्ष लागले आहे.
 
ऑस्‍ट्रेलियाने पहिल्‍या डावात ४६८ रन्सची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या या डावाला प्रत्युत्तर देताना भारताने ११४ धावा करत २ गडी गमावले. त्यानंतर सेहवाग (४ रन्स ) आणि द्रविड (२९ रन्स ) बाद झाल्यानंतर गौतम गंभीरने अर्धशतक झळकावत डाव सावरायचा प्रयत्न केला. मात्र, गंभीर ८३ रन्सवर आऊट झाला.
 
त्याआधी ऑस्ट्रेलियाने तूफान फटकेबाजी करताना टीम इंडियापुढे ४६८ रन्सचे आव्हान ठेवले. कर्णधार मायकेल क्‍लार्कने त्रिशतक तर हसीने दीडशतक करून टीम इंडियाच्या बॉलर्सच्या मर्यादा उघड्या पडल्या. या कसोटीतील दारूण पराभव टाळण्यासाठी टीम इंडियाला दोन दिवस खेळून काढण्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी फलंदाजांना खेळपट्टीवर अक्षरशः नांगर टाकून उभे राहावे लागणार आहे. ही कमाल सचिन आणि लक्ष्मण यांनी केली आहे. ही जोडी मैदानात ऑस्ट्रेलिया बॉलर्सला  झोडपले आहे.
 
टीम इंडिया -  २६२2/३
ऑस्ट्रेलिया -(पहिला डाव घोषित) - ६५९
टीम इंडिया (पहिला डाव) - १९१ 
 

First Published: Friday, January 6, 2012, 12:08


comments powered by Disqus