कोहली आऊट, टीम इंडिया ढेपाळली - Marathi News 24taas.com

कोहली आऊट, टीम इंडिया ढेपाळली

मॅचचा LIVE स्कोर जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
 
www.24taas.com , सिडनी
 
दुस-या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नांगी टाकली आहे. सचिन बाद झाल्यानंतर सेट झालेला लक्ष्मण आऊट झाला. त्यानंतर आलेला विराट कोहलीनेही निराशा केली. तो ९ रन्सवर आऊट झाला.
 
पहिल्या कसोटीत जशी हाराकिरी टीम इंडियाने पत्करली तशीच पुन्हा पत्करली आहे.  ही कसोटी हातची जाण्याची चिन्हे आहेत. मैदानात आर. अश्विन (२) आणि झहीर खान (८) खेळत आहेत.
 
क्रिकेटचा बादशहा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर ८० रन्सवर बाद झाल्यानंतर इंडियातील क्रिकेट प्रेमींची निराशा झाली. पुन्हा सचिनच्या महाशतकाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (६६ रन्स) आऊट झाला.
सचिन ८० रन्सवर खेळत असताना शतक झळकावणार अशीत सर्वांची अपेक्षा होती. अनेक जण सिडनी मैदानाकडे लक्ष लावून होते. मात्र, मायकेल क्लार्कच्या एका बॉलवर सचिन हसीव्दारे कॅच आऊट झाला. सचिनची विकेट गेल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आहे. मात्र, व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने (६६ रन्स) किल्ला लढवत असताना आऊट झाला. आता टीम इंडियाचा पराभव जवळ आल्याची नांदी ऑस्ट्रेलियन बॉलर्सने दिली आहे.
 
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुस-या कसोटी सामन्यात ऑस्‍ट्रेलियाने पहिला डाव चार गडी बाद ६५९ धावांवर घोषित केल्यानंतर टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. मात्र, गौतम गंभीरने गंभीर खेळी करत ८३ धावा फटकावताना टीम इंडियाची बाजू सावरली. गंभीरची विकेट गेल्यानंतर सचिन तेंडुलकर (७५ रन्स) आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण (५८ रन्स) या जोडीने नेटाने किल्ला लढवला. मायकेल क्लार्कने हा किल्ला फार काळ टिकू दिला नाही. त्यांने सचिनला आऊट केले.
 
टीम इंडिया (दुसरा डाव)  296/7 (87.3 ov)
ऑस्ट्रेलिया -  (पहिला डाव घोषित)  659/4
टीम इंडिया (पहिला डाव) 191
 

First Published: Friday, January 6, 2012, 12:08


comments powered by Disqus