Last Updated: Sunday, January 15, 2012, 14:38
www.24taas.com, मुंबई

ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या पर्थ कसोटीत तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात राहुल द्रविड ४७ रन्स आणि धोनी २ रन्सवर आऊट झाले. भारताने सकाळच्या सत्रात फक्त ७७ रन्स काढल्या आहेत आणि ऑस्ट्रेलिया सामना खिशात टाकण्याची चिन्हं आहेत. विराट कोहली हा एकमेव बॅटसमन शिल्लक आहे. लंच ब्रेकला भारत ६ विकेटसच्या मोबदल्यात फक्त १६५ धावसंख्या उभारू शकला.
भारत ४३ धावांनी पिछाडीवर आहे आणि फक्त चार विकेटस उरल्या आहेत. त्यामुळेच भारताला दुसऱ्या डावासाठी ऑस्ट्रेलियासमोर १०० धावांचे आव्हानही उभं करणंही कठिण जाणार आहे. हॅरिसने द्रविडची महत्वपूर्ण विकेट घेतली. त्याआधी स्टार्क आणि हॅरिस यांनी मेडन ओव्हर्स टाकल्या.
First Published: Sunday, January 15, 2012, 14:38